
सांगोला – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यान आणि दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात झाला. कार्यक्रमाचा प्रारंभ सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाला. या प्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते डी.जी. देशपांडे यांनी ‘सावरकर : जीवन, कार्य आणि प्रेरणा’ या विषयावर मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा पंचायत समितीचे सभापती चेतनसिंह केदार आणि गटविकास अधिकारी कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि सावरकरप्रेमी उपस्थित होते.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !