ग्राहकांचे दागिने आणि रक्कम घेऊन पसार झालेला व्यापारी अटकेत !

 

 

पालघर – सातपाटी येथील ‘सलीमा ज्वेलर्स’ या जवाहिर्‍याचा व्यापारी ग्राहकांनी ३ वर्षांपूर्वी दागिने घडवण्यासाठी दिलेले सोने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाला होता. तक्रार प्रविष्ट (दाखल) झाल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे. पालघर न्यायालयाने त्याला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस त्याच्या पत्नीचा शोध घेत आहेत.

गावातील अनुमाने १२५ नागरिकांचे सोने अथवा रोख रक्कम संबंधित दुकानात जमा असून ३ किलो सोन्याचा आणि रोख रकमेचा अपहार केल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.

संपादकीय भूमिका

ग्राहकांना फसवणार्‍यांना सव्याज दंडवसुलीची कठोर शिक्षाच द्यायला हवी !