पैठण येथे गोवंशियांची कत्तल करण्याचा धर्मांधाचा डाव पोलिसांनी उधळला 

प्रतीकात्मक छायाचित्र

पैठण (छत्रपती संभाजीनगर) – पैठण शहरातील शहा मोहल्ला या भागात गोवंशियांची अवैध कत्तल केली जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड घातली. पशूवधगृहात डांबून ठेवलेल्या आणि कत्तलीच्या छायेत असलेल्या गोवंशियांची पोलिसांनी सुटका केली आहे. एका धर्मांध आरोपीला पोलिसांनी रंगेहात कह्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला असून या अवैध धंद्यात अन्य कुणाचा सहभाग आहे का ? आणि हा गोवंश कुठून आणला गेला ? याचा शोध पोलीस घेत आहेत. (धर्मांधांकडून सातत्याने कायद्याचे उल्लंघन करून गोवंशियांची कत्तल करण्याचे धाडस केले जाते, हे संतापजनक आहे. अशा समाजकंटकांवर केवळ गुन्हे नोंद न करता त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, तरच अशा कायद्याचे उल्लंघन करणार्‍या प्रवृत्तींना आळा बसेल ! – संपादक)