प्रारंभिक अहवालातील निष्कर्ष

पुणे – संरक्षक रूळात (गार्ड रेल) अधिक अंतर राहिल्याने मुंबईहून सोलापूरला जाणार्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’चा २७ एप्रिल या दिवशी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात अपघात झाला होता. ही अभियांत्रिकी चूक असल्याचा अहवाल मध्य रेल्वेच्या चौकशी समितीने दिला आहे.
हा ‘वंदे भारत’चा देशातील पहिला अपघात ठरला. रेल्वे प्रशासनाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने प्रारंभिक अहवाल दिला असून अभियांत्रिकी विभागाकडून चूक झाल्याने डब्याचे पुढील चाक घसरून अपघात झाला असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.
पुणे स्थानकाच्या आवारातील ‘डायमंड क्रॉसिंग’जवळच्या २ रूळांमध्ये अंतर वाढल्याने चाकाचे नियंत्रण सुटले. या वेळी रेल्वेचा घंटा १० कि.मी. असा वेग होता. हा वेग अधिक असता तर अपघाताची तीव्रता वाढली असती.
‘गार्ड रेल’ म्हणजे काय?
मुख्य रूळांच्या समांतर आणि काही अंतरापर्यंत जे अतिरिक्त रूळ बसवले जातात त्याला ‘गार्ड रेल’ म्हणतात. ते मुख्य रूळांपेक्षा थोडे वेगळे असतात. रेल्वेचे चाक मुख्य रूळावरून घसरले, तर ‘गार्ड रेल’मुळे घसरलेले चाक या २ रूळांच्या मध्ये अडकून रहाते. मोठा अपघात होत नाही.
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती !