कारागृहातील बंदीवानांच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न

म्हापसा, २७ मे (वार्ता.)- कोलवाळ येथील कारागृहाच्या आवारात पुन्हा एकदा हिंसक आक्रमण झाल्याच्या वृत्तामुळे कारागृहातील सुरक्षाव्यवस्था आणि बंदीवानांची सुरक्षा याविषयी गंभीर चिंता निर्माण झाली आहे. एका आठवड्यापेक्षा अल्प कालावधीतील ही दुसरी घटना आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार कोलवाळ कारागृहात देवराज ह्यो या बंदीवानाला सहकारी बंदीवानांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे देवराज घायाळ झाला. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने तातडीने वैद्यकीय साहाय्याची व्यवस्था केली आणि घायाळ बंदीवानाला पुढील उपचारांसाठी म्हापसा जिल्हा रुग्णालयात भरती केले. या आधी राकेश पाटील या बंदीवानाला नारायण उपाख्य बाबू भालेकर या बंदीवानाने मारहाण केल्याची घटना घडली होती. राज्य कारागृहात वारंवार होणार्या हिंसक घटनांमुळे अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, बंदीवानांवरील देखरेख आणि कारागृहातील एकूण कायदा-सुव्यवस्था यांविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या ताज्या घटनेमुळे कारागृहात अधिक कडक देखरेख आणि भक्कम प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री