रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याचे प्रकरण

पणजी, २२ मे (वार्ता.) – धर्म आणि जात यांच्या आधारावर कोणताही पक्ष चालू शकत नाही. धर्म आणि जात यांच्या आधारावर पक्ष निर्माण होणे, हे गोव्यासाठी घातक आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षामधील (‘आर्जी’मधील) अंतर्गत वादामुळे पक्षाच्या अध्यक्षपदाचे मनोज परब यांनी त्यागपत्र दिल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पहिल्यांदात यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘आर्जी’ ही चळवळ वर्ष २०१६ पासून चालू झाली आणि नंतर वर्ष २०२१ मध्ये पक्ष स्थापन झाला. स्थानिक पक्षाविषयी लोकांमध्ये उत्सुकता असते. पहिल्याच निवडणुकीत ‘आर्जी’ने १० टक्के मते मिळवली, तसेच वीरेश बोरकर हे आमदार म्हणून निवडून आले. एकच आमदार निवडून आला, तरी पहिल्याच निवडणुकीत १० टक्के मते मिळवणे, ही एक पुष्कळ मोठी गोष्ट आहे. पक्ष स्थापन करून तो वृद्धींगत करण्यासाठी मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांनी पुष्कळ कष्ट घेतले आहेत आणि ही कौतुकास्पद गोष्ट आहे. मी राष्ट्रीय पक्षासाठी वर्ष १९९६ पासून काम करत आहे. मीसुद्धा पुष्कळ कष्ट घेतले आहेत. आमदार या नात्याने वीरेश बोरकर यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. ‘आर्जी’मधील वादाच्या अंतर्गत सामाजिक माध्यमात मागील ४ दिवस प्रसारित होत असलेले पोस्ट आणि व्हिडिओ मी पाहिले आहेत. हे पोस्ट आणि व्हिडिओ हे जात अन् धर्म यांवर आधारित आहेत. काही जणांनी देवावर निरनिराळी विधाने केलेली आहेत. मनोज परब हा एक खंबीर असा नेता आहे आणि त्याने पक्षाचे त्यागपत्र देणे ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. पक्षाचे पुढे काय होणार ? हे मला ठाऊक नाही. ‘आर्जी’ हा विरोध पक्ष असला, तरी त्याला माझ्या शुभेच्छा आहेत.’’
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी