सातारा जिल्हा रुग्णालयातील साहाय्यक अधीक्षकाला लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, २२ मे (वार्ता.) – येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय देयक मान्यतेसाठी लाच मागणार्‍या साहाय्यक अधीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. साहाय्यक अधीक्षक श्रीनिवास गजानन जोशी यांना ३० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले. (कोणताच सरकारी विभाग लाच न घेता काम करत नाही, हे गंभीर आहे ! – संपादक)

तक्रारदार यांचे वैद्यकीय देयक संमत करून त्यातील फरकाची रक्कम काढून देण्यासाठी वारंवार पैशाची मागणी करण्यात येत होती. अनेक दिवसांपासून काम प्रलंबित ठेवत लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी थेट लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीत तथ्य आढळल्याने सापळा रचण्यात आला.

त्यानुसार साहाय्यक अधीक्षक श्रीनिवास जोशी यांना ३० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले.