
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील सत्तांतरामुळे कोलकात्याला परतण्याच्या माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. नोव्हेंबर २००७ मध्ये मला याच शहरातून बाहेर काढण्यात आले होते. तेव्हापासून या शहरात परतण्याची अनुमती मिळालेली नाही. मला आशा आहे की, आता परिस्थिती पालटू शकते. मला नेहमीच कोलकात्याला परतायचे होते; पण माझी ही इच्छा अपूर्णच राहिली; कारण ना डाव्या आघाडी सरकारने ना तृणमूल सरकारने मला याची अनुमती दिली. यापूर्वी मी लिहिलेली दूरचित्रवाणीवरील एक मालिकाही तृणमूल सरकारच्या आदेशानंतर बंद करावी लागली होती. जर माझ्यासाठी कोलकात्यामध्ये रहाणे शक्य झाले, तर मी नक्कीच तिथे राहीन, अशा भावना बांगलादेशातून हद्दपार करण्यात आलेल्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केल्या आहेत. सध्या त्या देहलीमध्ये निर्वासिताचे जीवन जगत आहेत.
तस्लिमा पुढे म्हणाल्या की…,
१. ऑगस्ट १९९४ मध्ये बांगलादेशातून हद्दपार केल्यानंतर कोलकाता हेच माझे घर बनले होते; कारण तिथे मला त्याच बंगाली संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली, ज्यासाठी मी युरोप सोडून कोलकात्याला आले होते.
२. मला कोलकात्याला जाऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे आहे; कारण ती भारताची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. मला कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यातही सहभागी व्हायचे आहे. भारताच्या अनेक भागांचा प्रवास केला आहे आणि अलीकडेच सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी केरळलाही गेले होते.
३. जर राज्य सरकारने मला कोलकात्याला येण्याची अनुमती दिली, तर मी त्यांची खूप ऋणी राहीन. गेल्या २ दशकांपासून मी कोलकात्यात स्थायिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे आणि आता मी तिथे जाऊन रहाण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहे. जर राज्य सरकारने मला साहाय्य केले, तर मी तेथेच राहीन.
४. अनेक संघटनांनी कोलकात्याला येण्याविषयी माझ्याशी संपर्क साधला आहे; परंतु प्रत्यक्षात या शहराचा प्रवास कधी करू शकीन, याची अजून कल्पना नाही.
राज्यसभेत उपस्थित झाले होते सूत्र !
भाजप खासदार आणि बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी गेल्या वर्षी राज्यसभेत तस्लिमा नसरीन यांचे सूत्र उपस्थित केले होते आणि गृह मंत्रालयाला त्यांच्या कोलकाता येथील निवासाची व्यवस्था करण्याची विनंती केली होती.
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी