कोंढवा (पुणे) येथे लहान मुलांच्या खेळण्यावरून झालेल्या वादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न !

समाजकंटकांकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक

पुणे – कोंढवा येथे २ मुलांमध्ये खेळण्यावरून छोटासा वाद झाला. या किरकोळ घटनेला काही अशांतता पसरवणार्‍या घटकांनी २ धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडवण्यासाठी काही समाजकंटकांनी कोंढवा पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी ३ वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अफवा पसरवणार्‍यांवर कडक कारवाईची चेतावणी देत पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

संपादकीय भूमिका

धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करून पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्याची मजल जाणारे कोण आहेत ? हे वेगळे सांगायला नको ! पोलीस अशांवर त्वरित कठोर कारवाई करणार का ?