नागपूर पोलिसांनी नागरिकांचे लुटले गेलेले साडेचार कोटी रुपये आणि २३२ भ्रमणभाष केले परत !

 

नागपूर – स्वतःला सीबीआय किंवा ‘ईडी’चे अधिकारी भासवून ‘डिजिटल अरेस्ट’ची (‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे ऑनलाईन माध्यमातून प्रशासकीय अधिकारी अथवा पोलीस असल्याचे भासवून पीडित व्यक्तीला घाबरवून तिच्याकडून मोठी रक्कम हस्तगत करण्याचा प्रकार) भीती दाखवणे, तसेच शेअर बाजारात अवाजवी लाभाचे आमीष दाखवून निरपराध नागरिकांना लुटणार्‍या सायबर गुन्हेगारांच्या बँक खात्यांमधील ४ कोटी ४९ लाख २४ सहस्र २६६ रुपये सायबर पोलिसांनी गोठवले. न्यायालयाच्या आदेशानंतर ही संपूर्ण रक्कम आणि चोरीला गेलेले ४३ लाख रुपयांचे २३२ महागडे भ्रमणभाष संच पोलीस आयुक्तांनी नागरिकांना परत केले. या निमित्ताने आयोजित कार्यशाळेत ‘रिझर्व्ह बँके’चे साहाय्यक प्रबंधक पियुष तेलरांधे आणि सायबर तज्ञ यांनी नागरिकांना फसवणुकीपासून वाचण्यासाठी सतर्क रहाण्याचे आवाहन केले.