मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा !

सातारा, १५ मे (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुढील ६ महिने कोणताही मोठा कार्यक्रम होणार नाही, अशी घोषणा केली. सातारा येथे ‘प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी’ मेळावा पार पडला. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘संकटकाळात पंतप्रधानांनी आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र सरकारची वाटचाल असणार आहे. भारत सरकारने इतर देशांच्या तुलनेत केवळ ३.५० टक्के दरवाढ केली आहे. आज जगभरात इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेत ५१ टक्के, ब्रिटनमध्ये २२ टक्के, फ्रान्समध्ये २५, जपानमध्ये ३५ टक्के, जर्मनीत २७ टक्के, इस्रायलमध्ये ३० टक्के, दक्षिण कोरियात ३० टक्के, इटलीत ३० टक्के, सिंगापूरमध्ये ३०, पाकिस्तानसारख्या देशात तर २०० टक्के वाढ झाली आहे. याउलट पंतप्रधान मोदींनी आपल्या देशात केवळ ३.५० टक्के दरवाढ केली आहे. त्यांनी एवढे दिवस ही वाढ होऊही दिली नाही. परकीय चलन वाचवण्यासाठी ६ महिने सोने घेणे टाळा, इंधन वाचवता येईल तेवढे वाचवा, खतांचा अधिक उपयोग करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना सांगितल्या आहेत. मला निश्चिती आहे, महाराष्ट्रातील शिवरायांचा प्रत्येक मावळा पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देईल.’’
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !