Tamil Nadu Liquor Restrictions : तमिळनाडूमध्ये २१ वर्षांवरील व्यक्तींनाच दारू विकली जाणार !

मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचा निर्णय

तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी दारू विक्रीसाठी २१ वर्षांच्या वयोमर्यादेची कठोर कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे. सर्व मद्यविक्री केंद्रांवरील कर्मचार्‍यांना ग्राहकाच्या वयाची निश्चिती करणे बंधनकारक असेल. संशय आल्यास ग्राहकाला त्याचे ओळखपत्र (उदा. आधार कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र) दाखवावे लागेल. २१ वर्षांखालील व्यक्तींना दारू विकल्यास संबंधित कर्मचार्‍यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

सध्या तमिळनाडूमध्ये दारूची दुकाने दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत चालू असतात. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी ही वेळ रात्री ८ वाजेपर्यंत मर्यादित करण्याचा प्रस्ताव सरकाराच्या विचाराधीन आहे.

संपादकीय भूमिका

  • दारू कुणाला विकत आहे, यावर निर्बंध आणले, तरी प्रत्यक्षात ती कोण पीत आहे, याकडे सरकार कसे लक्ष ठेवणार ?
  • मुळात जनतेने दारू पिऊ नये, यासाठी तिच्यावर संस्कार करण्याचे दायित्व पालक असणार्‍या सरकारचे असून त्यासाठी कुठल्याही राज्यातील सरकार काही करतांना दिसत नाही !