वणी येथे गोवंश तस्करी; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त !

वणी (जिल्हा यवतमाळ), १० मे (वार्ता.) – वणी पोलिसांनी धडक कारवाई करत १ लाख रुपयांच्या गोवंशियांसमवेत साडेसात लाख रुपयांची वाहने असा साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १४ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. (गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात असतांनाही अशी प्रकरणे घडत असतील, तर कायद्याचा धाक कसा निर्माण होणार ? – संपादक)