तमिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाला सरकार स्थापन करण्यास राज्यपालांनी आमंत्रित केले नाही !
राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर टीव्हीके समर्थकांचे आंदोलन
(टीव्हीके म्हणजे तमिलगा वेत्री कळघम् – तमिळनाडू विजय महासंघ)

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत अभिनेते जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी बहुमताचा आकडा त्यांना गाठता आलेला नाही. त्यामुळे २ वेळा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊनही त्यांना राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलेले नाही. ‘११८ आमदार समवेत असल्याचे पत्र आणल्यावर आमंत्रित करू’, असे राज्यपालांकडून त्यांना सांगण्यात आल्याचे म्हटले जात आहे. राज्यपालांनी विजय यांना, ‘मी सरकार स्थापन करण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाला आमंत्रित करणार नाही’, असे आश्वासन दिले आहे. नियमानुसार राज्यपालांनी सर्वाधिक जागा असणार्या पक्षाला सरकार स्थापन करण्यास बोलावणे अपेक्षित असतांनाही बोलावले जात नसल्याने आणि दुसरीकडे द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) आणि अखिल भारतीय द्रमुक (एआयएडीएम्के) यांच्यात युती होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामुळे जोसेफ विजय यांच्या पक्षने म्हटले आहे की, जर या दोन द्रविड पक्षांनी सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला, तर टीव्हीके सर्व आमदार त्यागपत्र देतील.
८ मेच्या सकाळी टीव्हीकेच्या समर्थकांनी राज्यपाल भवनासमोर निदर्शने केली आणि घोषणाबाजी केली. पोलिसांनी अनेक समर्थकांना कह्यात घेतले. सूत्रांनुसार टीव्हीके आणि अण्णाद्रमुकच्या बंडखोर गटात उपमुख्यमंत्री पद आणि खाती यांच्या वाटणीवर चर्चा चालू आहे; मात्र सरचिटणीस एडप्पादी पलानीस्वामी याच्या विरोधात आहेत.
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान