
सातारा, ७ मे (वार्ता.) – श्रीक्षेत्र महाबळेश्वर हे भारतातील अत्यंत पवित्र आणि प्रमुख देवस्थान आहे. या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य टिकून ठेवण्यासाठी आणि हिंदु संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी येथे आदर्श ‘वस्त्रसंहिता’ (मंदिरात कपडे घालून येण्याच्या संदर्भातील नियमावली) लागू करा, अशी मागणी ‘बजरंग दला’च्या वतीने देवस्थान समितीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनामध्ये म्हटले आहे, महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक मंदिरात अत्यंत तोकडे कपडे घालून येतात. त्यामुळे देवस्थानच्या सात्त्विकतेला आणि पावित्र्याला बाधा पोचते. मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांनी भारतीय संस्कृतीचे पालन करणारी वेशभूषा परिधान करावी. अंगभर वस्त्रे परिधान केलेल्या भाविकांनाच गाभार्यात किंवा मंदिर परिसरात प्रवेश द्यावा. पाश्चात्त्य संस्कृतीच्या नावे होणारा स्वैराचार रोखण्यासाठी देवस्थान समितीने कडक नियमावली सिद्ध करावी.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !