भूतानमधील वृत्तपत्रांचा भारतावर आरोप

थिंपू (भूतान) – भारत सरकारची तेल आस्थापने भूतान, तसेच नेपाळला महागडे तेल विकत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भूतानमध्ये १६ मार्चनंतर पेट्रोल आणि डिझेल यांच्या मूल्यात मोठी वाढ झाली. राजधानी थिंपूमध्ये पेट्रोलचे दर ६३.२९ नगुल्टम (भूतानी चलन) प्रति लिटरवरून १०२.४० वर पोचले, तर डिझेल ७० वरून ९८ नगुल्टमवर गेले आहे. भूतान सरकारच्या सवलतीनंतरही झालेल्या या दरवाढीसाठी तज्ञांनी भारताकडे बोट दाखवले आहे. ‘द भूतानीज’ या वृत्तपत्राने या सूत्रावर सखोल अभ्यास केल्याचा दावा केला आहे.
वृत्तपत्राच्या वृत्तानुसार इंधनाचे दर वाढण्याचे कारण इराण-अमेरिका युद्ध असल्याचे सांगितले जात असले, तरी ते एकमेव कारण वाटत नाही. भूतानच्या व्यापार विभागाकडे भारताच्या ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’, ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ आणि ‘भारत पेट्रोलियम’ यांच्याकडून होणार्या पुरवठ्याविषयी फार कमी माहिती आहे. विभागाकडे उपलब्ध असलेल्या तपशिलात केवळ इंधनाचे मूल्य आणि ते पोचवण्याचे शुल्क यांचाच अंतर्भाव आहे. यामुळे भारताकडून होणार्या तेलविक्रीच्या किंमतीविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !