८ लाखांहून अधिक अंडीही नष्ट

नंदुरबार – कोंबड्यांमुळे होणार्या ‘बर्ड फ्ल्यू’या आजाराच्या संसर्गामुळे नवापूर येथे गेल्या ४ दिवसांत १ लाख ९३ सहस्र ६६७ कोंबड्या मारण्यात आल्या. त्यांची ८ लाखांहून अधिक अंडीही नष्ट करण्यात आली आहेत. या भागातील नागरिकांना चिकन आणि अंडी खाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. २१.२२ मेट्रिक टन पशूखाद्य भूमीत गाडून नष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. संजय खाचणे यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर १५० कर्मचार्यांच्या २५ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसर्ग रोखण्यासाठी १ किलोमीटर, ३ किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा परिघांत क्षेत्र निश्चित करून उपाययोजना चालू करण्यात आल्या आहेत. कुक्कुटपालन केंद्रातील नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी दक्षता घेतली जात आहे.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !