ध्वजस्तंभाचा शिलान्यास सोहळा पार पडला !

नाशिक – सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे विविध पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत आहे. भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे विधान जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणार्या ध्वजस्तंभाचा ‘शिलान्यास सोहळा’ उत्साहात पार पडला. जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देव गिरी यांच्या हस्ते शिलान्यास करण्यात आला. कुशावर्त तीर्थ येथे हा सोहळा पार पडला. त्या वेळी मंत्री श्री. महाजन बोलत होते.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !