
नाशिक – सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर ६ मे या दिवशी येथे ‘कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयातून आवश्यक पूर्वसिद्धता आणि काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश उद्योग विकास आयुक्त तथा उद्योग संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
कुशवाह म्हणाले, ‘‘ही गुंतवणूक परिषद नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण असून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, हे सर्व यंत्रणांचे सामूहिक दायित्व आहे. त्यामुळे नवउद्योजक आणि उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदार यांना याविषयी कळवण्यात येऊन सहभागासाठी उद्युक्त करावे. प्रत्येक विभागाने दायित्व पार पाडून कार्यक्रम यशस्वी करावा. या परिषदेद्वारे नाशिकला औद्योगिक नकाशावर अधिक ठळक स्थान मिळेल.’’
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !