महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांकडून महासभेच्या कार्याचा संक्षिप्त आढावा !

सातारा, ३० एप्रिल (वार्ता. ) – ‘अखिल भारत हिंदु महासभे’च्या स्थापनेला १११ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर हिंदु महासभेचा वर्धापनदिन सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी अधिवक्ता सतीश खानविलकर, विलास पाटील, धनाजी कदम, प्रीती उमेश गांधी, सुनिल घोलप, सत्वशीला सणस आदी मान्यवर उपस्थित होते. हिंदु महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. धनराज जगताप, श्री. श्याम चितळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अधिवक्ता ट्विंकल ओसवाल यांनी हिंदु ध्वजगीत गायले. सौ. काळे यांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या गीताने कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. सुनील मोरे यांनी केले.
अखिल भारत हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता दत्तात्रय सणस म्हणाले, ‘‘१११ वर्षांपूर्वी लाला लाजपत राय, सर महेंद्रचंद्र नंदी महाराज, लाला हंसराज, पंडित ठाकुरदत्त वैद्य यांनी ‘हिंदु महासभे’ची स्थापना केली. स्वामी श्रद्धानंद, राजा नरेंद्रनाथ, डॉ. राजेंद्रप्रसाद, ना.चि. केळकर, डॉ. मुंजे, भाई परमानंद यांचाही या संघटनेत समावेश होता. हिंदु राष्ट्रीय सभेची आवश्यकता वर्ष १९०५ च्या बंगालच्या फाळणीनंतर जाणिवेत आली. ढाका येथे ‘मुस्लिम लीग’ची स्थापना झाली. पूर्व बंगालमध्ये हिंदू स्त्रियांवर अत्याचार वाढले. हिंदू नवयुवकांनी अनुशीलन समित्या स्थापन केल्या. आर्य समाजाने पंजाबमध्ये हिंदु जागृती घडवली. वर्ष १९०७ मध्ये ‘पंजाब हिंदु सभे’ची स्थापना झाली. ऑक्टोबर १९०९ मध्ये लाहोर येथे पहिली ‘पंजाब हिंदु परिषद अतुलचंद्र चटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुलतान आणि अंबाला अधिवेशनात अखिल भारतीय हिंदु महासभेचे प्रस्ताव संमत झाले. वर्ष १९१५ च्या हरिद्वार कुंभमेळ्यात सर महेंद्रचंद्र नंदी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पहिले अधिवेशन झाले. त्यात घटना आणि ध्येय निश्चित झाले.’’
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान