मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

पणजी, २८ एप्रिल (वार्ता.) – केंद्र सरकारने ‘बेंगळुरू-मडगाव’ रेल्वेमार्गावर ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसला संमती दिली आहे. यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘केंद्राच्या या निर्णयामुळे गोव्याची दळणवळण व्यवस्था, पर्यटन आणि आर्थिक विकास यांना मोठी चालना मिळणार आहे.’’ ‘वन्दे भारत’चे ‘बेंगळुरू-मडगाव’ मार्गासाठीचे वेळापत्रक लवकरच घोषित होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘बेंगळुरूसारख्या मोठ्या माहिती तंत्रज्ञान आणि व्यावसायिक शहराला जोडणारी गोव्यातून थेट, वेगवान आणि आधुनिक रेल्वेसेवा चालू होणे, हे या राज्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. या सेवेच्या माध्यमातून पर्यटकांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याचा व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्र यांनाही लाभ होणार आहे.’’ ‘बेंगळुरू-मडगाव’ मार्गावरील ‘वन्दे भारत’मुळे गोवा आणि कर्नाटक राज्यांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या अल्प होणार आहे. यामुळे विशेषत: बेंगळुरू येथून गोव्यात येणार्या पर्यटकांमध्ये वाढ होणार आहे. ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ ही देशातील अत्याधुनिक आणि सेमी हायस्पीड (मध्यमगती) रेल्वेसेवा आहे. ती ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत विकसित करण्यात आली आहे.
नवी मुंबईत महापालिकांच्या शाळेत आता इंग्रजी माध्यमातून बालवाडीचे वर्ग चालू होणार !
शेतकर्यांच्या कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही आता ऑनलाईन होणार !
मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मिडिया हब’ उभारणार !
आंबिवली (कल्याण) येथील इराणी लोकांकडून बसवर दगडफेक; प्रवासी घायाळ
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !