चिंबल येथे अनधिकृत ७० कूपनलिका

टाळे ठोकण्याचा न्यायालयाचा आदेश

प्रतिकात्मक चित्र

पणजी – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने चिंबल परिसरातील अनुमाने ७० अनधिकृत कूपनलिकांना टाळे ठोकण्याचा आदेश गोवा सरकारच्या जलस्रोत खात्याला दिला आहे. तसेच ५ मे या दिवशी या कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अनधिकृत कूपनलिकांना टाळे ठोकण्याच्या प्रक्रियेच्या कालावधीत सुरक्षा पुरवण्यासाठी जुने गोवे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत, तर चिंबल पंचायतीच्या सचिवांना या कारवाईत सहकार्य करण्यास सांगितले आहे.