टी.सी.एस्. आस्थापनाचे प्रकरण

नाशिक – येथील टी.सी.एस्. आस्थापनातील धर्मांतराच्या प्रकरणी नाशिक न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाने सांगितले की, हा कट नाशिकपुरता मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर मलेशियापर्यंत पसरलेला आहे.
विशेष सरकारी अधिकारी अजय मिश्रा म्हणाले, ‘‘मुख्य आरोपी निदा खान आणि तिच्या साथीदारांचा सहभाग असणारे महत्त्वपूर्ण पुरावे सापडले.’’
सहआरोपी दानिश शेखने हिंदु महिला तक्रारदाराची महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे घेतली होती. ती त्याला मालेगावमधील एका पथकाला सुपूर्द करायची होती. याव्यतिरिक्त इम्रान नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून पीडितेला मलेशियाला पाठवण्याची योजना आखण्यात आली होती. बचाव पक्षाच्या अधिवक्त्याने आरोप फेटाळले.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !