
मुंबई – सांताक्रूझ येथील ७० वर्षीय निवृत्त आयटी व्यावसायिकाची ‘टाटा पॉवर’चे अधिकारी असल्याचे भासवून २ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी वांद्रे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदाराने वीज यंत्रणेतील नाव पालटण्यासाठी टाटा पॉवरकडे अर्ज केला होता. त्यानंतर नाव पालटल्याचा त्यांना अधिकृत संदेशही प्राप्त झाला. काही दिवसांनी एका अज्ञाताने त्यांना ‘व्हॉट्सॲप’द्वारे संपर्क करून ‘टाटा पॉवर’मधून बोलत असल्याचे सांगितले आणि नवीन नाव अद्ययावत करण्यासाठी ई-केवायसी (इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ओळख पटवणे) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे सांगितले. आरोपीने एका लिंकवरून बनावट संगणकीय धारिका डाऊनलोड करण्यास भाग पाडले. तक्रारदाराने तसे केल्यावर त्याच्या भ्रमणभाषचे संपूर्ण नियंत्रण आरोपीकडे गेले. आरोपीने बँक खात्यातील शिल्लक रक्कम तर काढलीच आणि एक कर्जही लगेच संमत करून घेतले. या पैशांतून आरोपीने स्वतःच्या क्रेडिट कार्डचे देयक भरले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !