उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘मिसिंग लिंक’ची पहाणी !

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची पहाणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या प्रकल्पामुळे अर्धा घंट्याने प्रवास लवकर होणार असल्यामुळे नवी मुंबई विमानतळालाही लाभ होणार आहे. या मिसिंग लिंकमुळे अपघातांची शक्यता न्यून होईल, असे उपमुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची वैशिष्ट्ये

खोपोली ते कुसगाव यामध्ये असलेल्या या रस्त्याचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब आणि जगातील सर्वांत रूंद बोगदा आहे. ‘टायगर व्हॅली’वरील केबल-स्टेड पुलाचे १८० मीटर उंच टॉवर या प्रकल्पाची ओळख ठरत आहेत, तर जवळपास डोंगर फोडून काढलेले ९ कि.मी.चे बोगदे आणि लोणावळा तलावाखालून मार्गक्रमण करतात. याचे अभियांत्रिकी काम हे अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केले आहे. येथे हवेच्या जोरामुळे काम करणेही अवघड होते. अतिशय अवघड असा हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.