‘आज आपण ‘आपल्या घरातील चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा यांचा स्रोत असलेले देवघर कसे असावे ?’, याविषयी माहिती पाहूया.

१. देवघरातील देवांच्या संदर्भातील काही सूत्रे !
अ. ‘घरामध्ये एकाच प्रकारचे दोन देव असू नयेत’, हे आपण सर्व जण जाणतोच. हा नियम प्रतिष्ठापित मूर्तींसाठी आहे. देवतांची चित्रे देवघरात ठेवण्याच्या संदर्भात शास्त्रकार भाष्य करत नाहीत; कारण चित्रे आणि छायाचित्रे या आधुनिक सोयी आहेत. ‘देवतांच्या मूर्ती आणि गुरूंच्या पादुका’, याच केवळ देवघरात पूजनीय आहेत’, अशी शास्त्रकारांची गृहितके आहेत.
आ. अग्नीमुळे दग्ध झालेल्या (जळालेल्या) आणि तुटलेल्या मूर्तींची पूजा करू नये.

२. पूजक ज्या आसनावर किंवा पाटावर बसेल, त्यापेक्षा अधिक उंचीवर देवघर असावे.
३. देवघरातील मूर्तींची मांडणी

अ. ज्यांच्याकडे ‘पंचायतन (पाच देवतांचा समुदाय)’ असेल, त्यांनी त्याप्रमाणे देवांची मांडणी करावी. जो आपला कुलदेव अथवा कुलदेवी असेल, त्यांच्या ‘पंचायतना’प्रमाणे मांडणी करावी, उदा. कुलदेव बालाजी असेल, तर विष्णुपंचायनाप्रमाणे मांडणी करावी, कुलदेव रामेश्वर आदी शिवाचे रूप असेल, तर शिवपंचायतनाप्रमाणे इत्यादी. ‘पंचायतनाप्रमाणे मूर्तींची मांडणी कशी करावी ?’, हे वरील रेखाचित्रात दिले आहे.’ (साभार : ‘धर्मसिंधु’)
आ. ज्यांच्याकडे पंचायतन नसेल, त्यांनी देवतांची मांडणी पुढीलप्रमाणे करावी – ‘देवघरात मध्यभागी गणपतीची मूर्ती ठेवावी. पूजा करणार्याच्या उजव्या हाताला स्त्रीदेवता, उदा, कुलदेवी, अन्नपूर्णा इत्यादी ठेवाव्यात आणि पूजा करणार्याच्या डाव्या हाताला पुरुषदेवता, उदा. कुलदेव इत्यादी ठेवावेत.’
(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ – देवघर आणि पूजेतील उपकरणे)
४. शाळिग्राम आणि बाणलिंग यांची पूजा

‘शाळिग्राम’ हा विष्णुस्वरूप म्हणून आणि ‘बाणलिंग’ हे शिवस्वरूप म्हणून पूजले जाते. त्यांच्या पूजनाचे नियम पुढीलप्रमाणे आहेत.
अ. शाळिग्राम भग्न किंवा तुटलेला असला, तरी पूजा करण्यास योग्य आहे.
आ. स्त्रियांनी शाळिग्राम आणि बाणलिंग यांची पूजा स्पर्शाने करू नये. दुरून फुले इत्यादी अर्पण करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी श्रीविष्णूची मूर्तीरूपात आणि शिवाची शिवपिंडीच्या स्वरूपात पूजा अवश्य करावी.
१. ‘सर्व वर्णियांनी सर्व देवांच्या मूर्ती पूजाव्यात’, असे स्पष्ट शास्त्रवचन आहे.
२. विकत घेतलेला शाळिग्राम मध्यम जाणावा आणि याचना करून मिळवलेला शाळिग्राम सर्वांत कनिष्ठ जाणावा. परंपरेने पूजेसाठी प्राप्त झालेला किंवा गुरूंनी दिलेला शाळिग्राम पूजेसाठी सर्वाेत्तम आहे.
३. आवळ्याएवढ्या आकाराचा लहान शाळिग्राम घरातील पूजेसाठी श्रेष्ठ आहे. त्याहून जितक्या लहान आकाराचा शाळिग्राम असेल, तेवढे त्याचे चांगले फळ समजावे.
४. साधारणपणे देवघरात नव्याने मूर्ती आणली, तर तिची प्राणप्रतिष्ठापना करणे आवश्यक असते; मात्र शाळिग्राम देवघरात पूजेसाठी ठेवतांना वरील विधी करण्याची आवश्यकता नाही. शाळिग्रामामध्ये निसर्गतःच भगवान महाविष्णूचा वास असतो. महापूजा करून तो देवघरात स्थापन करावा आणि नंतर नित्य पूजा चालू करावी.’(साभार : ‘धर्मसिंधु’)
५. देवघराविषयीचे सामान्य आचार
‘धर्मग्रंथांमधील देवघराविषयीचे उल्लेख आपण जाणून घेतले; परंतु धर्मग्रंथांमध्ये विदित नसलेले सामान्य आचार पाळल्यानेही देवघराचे पावित्र्य टिकून रहाते. त्याविषयी पुढे दिले आहे.
अ. देवघरावर उदबत्तीचे पुडे, वाती, काड्यापेटी इत्यादींचा पसारा ठेवू नये. देवघर आणि सभोवतालचे आवार स्वच्छ अन् टापटीप असावे.
आ. शक्य असल्यास देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा अखंड चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा. दुर्लक्षाने दिवा शांत झाल्यास वात स्वच्छ करून तो पुन्हा प्रज्वलित करावा. अशा प्रकारचा दिवा शांत झाल्याबद्दल प्रायश्चित्त घेण्याची आवश्यकता नसते. (नवरात्रीतील नंदादीपच्या संदर्भात (अखंड चालू ठेवायचा दिव्याच्या संदर्भात) हे सूत्र लागू होणार नाही. शारदीय नवरात्रीच्या आधी त्या संदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत.)
इ. दिव्यासाठी लागणारे तूप किंवा तेल आणि स्वयंपाकाचे तूप किंवा तेल निराळे ठेवावे.’
– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (१४.४.२०२६)
‘वरील लिखाण आमच्या अल्पमतीनुसार आहे. यामध्ये विद्वानांना काही पालट सुचवायचे असल्यास किंवा अधिक माहिती उपलब्ध करून द्यायची असल्यास सनातन वेदपाठशाळेच्या ८१८०९६८६६० या दूरभाष क्रमांकावर संपर्क करावा’, ही नम्र विनंती !’
– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (८.४.२०२६)
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !