कुटुंबासह केली श्री बालाजीची पूजा, पीठाधीश्वर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याशी चर्चा

नागपूर – भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘बागेश्वर धाम’ला सहकुटुंब भेट देऊन दर्शन घेतले. सर्वोच्च घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तीने या श्रद्धास्थानाला भेट दिल्याने आणि पीठाधीश्वर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याशी चर्चा केल्याने दौर्याची सकारात्मक चर्चा होत आहे. भूषण गवई यांनी पत्नी सौ. तेजस्विनी आणि पुत्र ज्योतिरादित्य यांच्यासह बागेश्वर बालाजीचे दर्शन घेऊन विधीवत् पूर्जा केली. या भेटीची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. बागेश्वर धामच्या ‘एक्स’ खात्यावरून याची माहिती देण्यात आली आहे.
दर्शन घेतल्यावर भूषण गवई यांनी धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये अर्धा घंटा आध्यात्मिक विषयांवर सखोल चर्चा झाली. शास्त्री यांनी त्यांना श्री बालाजीचे चित्र भेट दिले. भूषण गवई यांनी धाममधील गुरुकुलासह तेथे राबवल्या जाणार्या सामाजिक-धार्मिक उपक्रमांची आत्मीयतेने माहिती घेऊन त्यांचे कौतुक केले. ‘श्रद्धा आणि समाजसेवा यांचा सुंदर समन्वय आहे’, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
भूषण गवई यांची ही पहिलीच भेट नव्हती. पदावर असतांनाही त्यांनी अनेकदा धामला भेट दिली आहे. तथापि सध्याच्या काळात काही बुद्धीप्रामाण्यवाद्यांकडून आध्यात्मिक शक्तींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतांना न्यायव्यवस्थेतील अशा वरिष्ठ व्यक्तीने ठेवलेली ही दृढ श्रद्धा धर्माभिमानी हिंदूंसाठी उत्साहवर्धक ठरत आहे.
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !