समस्त हिंदूंना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन !

रत्नागिरी – गोमातांचे संरक्षण आणि संवर्धन होऊन त्यांना राष्ट्रमाता म्हणून मान्यता मिळावी, यासाठी रत्नागिरीत २७ एप्रिल या दिवशी सकाळी ९.३० वाजता श्री पतीतपावन मंदिर येथे एकत्र जमून तहसील कार्यालयापर्यंत गो-सन्मान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेत सर्व गोभक्त, गोरक्षक, गोप्रेमी हिंदूंनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशभर गो-सन्मान आवाहन अभियान चालू असून या अनुषंगाने श्री पतीतपावन मंदिर येथे २१ एप्रिलला सायंकाळी झालेल्या बैठकीत वृंदावन येथिल गोवत्स योगी श्री जगदिशानंद महाराज यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या वेळी श्री जगदिशानंद महाराज म्हणाले की, गोमाता ही हिंदुस्थानचा प्राण असून आज गोमातेची होणारी उपेक्षा, तिची होणारी हत्या ही देशाला आणि हिंदूंना लागलेला कलंक आहे आणि हा कलंक मिटवण्याची वेळ आली आहे. यासाठी गोमातेला राष्ट्रमाता घोषित केल्याविना, तिला संरक्षित केल्याविना स्वस्थ बसायचे नाही. यासाठी सर्व हिंदूंनी एकजूट होऊन गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी सोमवार, २७ एप्रिल या दिवशी गो-सन्मान पदयात्रेमध्ये सहभागी व्हावे.
या आवाहनाला सर्व हिंदु संघटना, संस्था, हिंदुत्वनिष्ठ धर्माभिमानी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘गोमातेच्या संरक्षणासाठी गोपालन मंत्रालयाची स्थापना व्हावी, तसेच शेतकरी, गोशाळा यांना गोवंशियांची देखभाल करण्यासाठी अनुदान मिळून गोमातांना संरक्षण मिळावे, गोमाता राष्ट्रमाता होणे आवश्यक आहे’, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या अभियानासाठी स्वाक्षरी मोहीम चालू करण्यात आली आहे. त्यामध्ये स्वाक्षर्या करण्यासाठी सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे