पीडितेकडून धर्मांध आरोपींच्या लैंगिक छळवणुकीचा पाढा

  • नाशिक येथील टी.सी.एस्. व्यावसायिक आणि धर्मांतर जिहाद प्रकरण

  • निदा खान करायची प्रतिदिनच्या बैठकीत मुलींना छळण्याचे नियोजन !

  • नेटचे ‘पासवर्ड’ अश्लील शब्द दिले जायचे !

नाशिक – टी.सी.एस्. धर्मांतर प्रकरणातील एका पीडितेने रझा मेनन आणि आसिफ अन्सारींकडून मुलींचा छळ चालू असल्याचे सांगितले आहे. ‘‘तुझी फिगर ‘झिरो’ आहे, गरज पडली तर कधीही बोलव’’, असे दोघे म्हणायचे.

‘तुमचा महादेव भगवान आहे का ? गणेश महादेवाचा मुलगा आहे का ?’ असेही विचारायचे. ‘‘गुढीपाडव्याला आसिफ अन्सारीने साडीचा पदर ओढला होता. मी वळून बघताच त्याने वाईट दृष्टीने हसत बघत राहिला. इतरत्र जागा असली, तरी मुद्दाम माझ्या जवळ येऊन बसायचा. माझ्याशी लगट, स्पर्श करायचा, अश्लील शेरे मारायचा करायचा’’, असेही या पीडितेने सांगितले, असे माध्यमांनी प्रसारित केले आहे. ‘रझा मेनन मला ऑफिसमध्य ‘प्लेअर’ (खेळाडू) म्हणायचा’, असेही पीडितेने सांगितले.

मुख्य सूत्रधार असलेली एच्.आर्. निदा खान मात्र गेल्या २० दिवसांपासून पसार आहे. (अजूनही पसार निदा खानचा शोध पोलीस लावू शकलेले नाहीत, याचा अर्थ तिच्या मागे मोठे आंतरराष्ट्रीय जाळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही !  – संपादक) प्रतिदिनच्या कामाच्या बैठकीत सांगून निदा खान हिंदु मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी ‘ऑपरेशन डिपार्टमेंट’ म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी जप्त केलेल्या भ्रमणभाषमधून प्रतिदिन तरुणींचे अश्लील संदेशातून विनयभंग केल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे, तर ‘नेट’चा ‘पासवर्ड’ अश्लील नावाने किंवा हिंदु मुलींच्या धार्मिक भावना दुखावतील, अशा पद्धतीने निर्माण केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

शफी शेख आणि रझा मेमन यांच्या भ्रमणभाषमधील पुसलेली सामुग्री पोलीस परत मिळवत आहेत.