
सांगली, २१ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान २०२६’ अंतर्गत २० एप्रिल या दिवशी सांगली आगाराचे सर्वेक्षण करण्यात आले. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत राबवलेली स्वच्छता मोहीम आणि बसस्थानकाच्या दूरवस्थेवर करण्यात आलेल्या उपाययोजना यांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रादेशिक समितीने आगाराला भेट दिली. समितीने बसस्थानक परिसर आणि प्रवासी प्रतिक्षालय, चालक-वाहक विश्रांतीगृह आणि महिला विश्रांतीगृह अन् सुलभ शौचालय अन् आगारातील विविध कार्यालये यांची पहाणी केली.
या वेळी ‘प्रादेशिक स्वच्छता सर्वेक्षण समिती’चे प्रमुख श्री. रोहन पलंगे यांनी सांगली बसस्थानकाचे परिसरातील स्वच्छता, नीटनेटके नियोजन यांविषयी समाधान व्यक्त केले, तसेच बसस्थानकाच्या आवारात नवीन उद्यान सिद्ध करण्याचे निर्देश दिले.
या संदर्भात सांगली आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्री. राजेंद्र घुगरे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले की, सांगली बसस्थानकाच्या परिसरात सुशोभित उद्यान सिद्ध करण्यात येणार आहे. बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून शासनाच्या परिपत्रकातील माहितीप्रमाणे प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रवाशांनीही बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी साहाय्य करायला हवे.
या सर्वेक्षण समितीमध्ये अमरावती प्रदेशाचे वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी श्री. नितीन देशमुख, पत्रकार श्री. अंजर अथणीकर आणि प्रवासी मित्र प्रतिनिधी श्रीमती सुनंदा चिखलगे यांचा समावेश होता. प्रादेशिक स्वच्छता सर्वेक्षण समितीचे प्रमुख आणि अमरावती प्रदेशाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. रोहन पलंगे आहेत.
पहाणीच्या वेळी सांगली आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्री. राजेंद्र घुगरे, सांगली विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी श्री. संतोष बोगरे, विभागीय सांख्यिकी अधिकारी श्री. अनिल पार्टे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती शीतल माने, स्थानकप्रमुख श्री. महेश पाटील यांसह श्रीकांत दळवी, विशाल कुर्ले, दीनानाथ डवरी, युवराज डोळस आणि संतोष माळी हे रा.प. कर्मचारी उपस्थित होते.
अभियानाचा उद्देश !
राज्याचे परिवहन मंत्री यांच्या निर्देशानुसार राबवण्यात येत असलेल्या या अभियानाचा मुख्य उद्देश बसस्थानके स्वच्छ, सुंदर आणि प्रवासीभिमुख करणे हा आहे. सांगली आगाराने गेल्या ३ महिन्यांत केलेल्या दैनंदिन स्वच्छतेचे मूल्यमापन आता अहवाल स्वरूपात सादर केले जाणार आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !