
पणजी, १७ एप्रिल (वार्ता.) – कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांना गांजा हे अमली पदार्थ पुरवतांना सांखळी येथील एका पोलीस हवालदाराला कारागृह प्रशासनाने रंगेहात पकडले.
संबंधित पोलीस हवालदार बंदीवानांना गांजा पुरवत असल्याची गोपनीय माहिती कारागृह प्रशासनाला मिळाली होती आणि या आधारे सापळा रचून त्याला रंगेहात कह्यात घेण्यात आले. संबंधित पोलीस हवालदाराकडून १६५ ग्रॅम गांजा कह्यात घेण्यात आला. या प्रकाराची पोलीस प्रशासनाने गंभीर नोंद घेतली आहे आणि संबंधित कर्मचार्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
नैऋत्य मौसमी पावसाचे (मान्सूनचे) केरळमध्ये आगमन
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !