
रायपूर (छत्तीसगड) – मंदिरांचे पद्धतशीर व्यवस्थापन सुनिश्चित करणे, मंदिरांच्या भूमींवरील अतिक्रमण थांबवणे आणि मंदिरांना सनातन धर्माच्या प्रसारासाठी प्रभावी केंद्र बनवणे या उद्देशाने छत्तीसगडमधील प्रमुख मंदिरांचे विश्वस्त, महंत आणि पुजारी यांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ‘छत्तीसगड मंदिर महासंघ’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निमित्ताने उपस्थित सर्व मंदिर प्रतिनिधींनी संघटितपणे काम करण्याचा निर्धारही व्यक्त केला. १४ एप्रिल या दिवशी शांतीनगर येथील ‘बिमतारा सभागृहा’त झालेल्या या बैठकीत छत्तीसगडसह देशभरात मंदिर महासंघाच्या माध्यमातून चालू असलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला छत्तीसगडमधील ८० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त, महंत आणि पुजारी उपस्थित होते. याप्रसंगी पू. कान्हा महाराज, श्री नीलकंठेश्वर मंदिराचे पंडित नीलकंठ महाराज, नारायण मंदिराचे महंत शर्माजी, महंत अरुण मिश्रा, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संयोजक
श्री. सुनील घनवट, रायपूर जिल्हा संयोजक श्री. मदन मोहन उपाध्याय, सह-संयोजक श्री. प्रवेश तिवारी, कायदेशीर सल्लागार अधिवक्ता आशिष शर्मा, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री कमल बिस्वाल आणि हेमंत कानस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक