कल्याण येथे वनविभागाचे २ लाचखोर कर्मचारी कह्यात !

 

ठाणे, १७ एप्रिल (वार्ता.) – कल्याण तालुक्यात नवीन पेट्रोल पंपासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यासाठी ५० सहस्र रुपयांची लाच मागणार्‍या वनविभागातील २ कर्मचार्‍यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कह्यात घेतले आहे. वनपाल विलास सानप आणि वनसंरक्षक रेखा गायकवाड अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदाराकडून तडजोडीअंती ठरलेली २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना मामनोली येथील कार्यालयात रेखा गायकवाड यांना सापळा रचून कह्यात घेण्यात आले. सानप यांनी गायकवाड यांना ही लाचेची रक्कम घ्यायला सांगितले होते. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)