बालिकेवरील अत्याचाराचे प्रकरण

दौसा (राजस्थान) – येथील एका ४ वर्षांच्या बालिकेला चॉकलेटचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करणारा तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक भूपेंद्र सिंह यादव या नराधमाला पॉक्सो न्यायालयाने २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासह न्यायालयाने आरोपीला २ लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून ही रक्कम पीडितेला दिली जाणार आहे. यासह पीडितेला ३ लाख रुपये भरपाई देण्याची शिफारस करण्यात आली आहे. वर्ष २०२३ मध्ये ही घटना घडली होती.
ही घटना समोर आल्यानंतर राजस्थानमध्ये खळबळ उडाली होती. पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भूपेंद्र सिंह यादव याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत तत्काळ गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. पोलीस विभागाने त्याला तातडीने सेवेतून बडतर्फ केले. या प्रकरणाचे अन्वेषण वेगाने पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) करण्यात आले. पॉक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश रेखा राठोड यांनी साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे यांच्या आधारे भूपेंद्र सिंह यादव याला दोषी ठरवले. या खटल्यात सरकारच्या बाजूने विशेष सरकारी अधिवक्ता जितेंद्र कुमार सैनी यांनी युक्तीवाद केला.
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !
‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये यापुढे दारूला अनुमती नाही ! – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
‘महात्मा फुले वाड्या’च्या परिसरातील वटपूजनावर लादलेली बंदी मागे !
Data Centers : अमर्याद ‘डेटा सेंटर्स’मुळे उद्भवणार्या जलसंकटाविषयी विधान परिषदेत पडसाद !
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !