
कोल्हापूर, १५ एप्रिल (वार्ता.) – बहुराष्ट्रीय आस्थापनांमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धर्मांतर यांचे षड्यंत्र रोखण्यासाठी यामागील ‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’ यांचे सखोल अन्वेषण करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर येथे जिल्हा प्रशासनास देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारले. (असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वत:हून कारवाई केव्हा करणार ? – संपादक)
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, श्री. कृष्णात पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु एकता आंदोलनाचे शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, हिंदु महासभेचे उपाध्यक्ष श्री. विकास जाधव, श्री. नंदकुमार घोरपडे, महिला शहराध्यक्ष सौ. पूजा शिंदे, हिंदुत्वनिष्ठ श्री. दिलीप दळवी, श्री. शशी बीडकर, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम जरग, भाजपचे एम्.बी. देवणे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे, प्रीतम पवार, आसावरी एरंडे, साधना पट्टणशेट्टी यांसह अन्य उपस्थित होते.
या प्रसंगी अन्य दोन मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. त्याच्या मागण्या पुढील प्रमाणे
१. एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ती ८ वीच्या पाठ्यपुस्तकातून वगळलेला मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्यात यावा.
२. ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने’अंतर्गत राज्यातील ३०८ मदरशांना दिलेले ५० लाख रुपयांचे अनुदान त्वरित थांबवून राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाचे रक्षण करावे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान