
कोल्हापूर – येथील ‘छत्रपती महाराज शाहू महाराज टर्मिनस’वर चालू असलेल्या ४३ कोटी रुपयांच्या विकासकामांचा आढावा घेत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे अधिकार्यांना विविध सूचना केल्या. यात तिकीट खिडकी, वाहनतळ व्यवस्था, रिक्शाथांबा, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी सुविधा, रेल्वेगाड्यांविषयी माहिती देणारा फलक यांसह विविध कामे वेळेवर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होण्याच्या सूचना केल्या.
कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला १३५ वर्षे पूर्ण झाली असून गेल्या दीड वर्षात रेल्वेस्थानकावर अनेक कामे चालू आहेत. रेल्वेस्थानकावरील सर्व कामांची पहाणी करून ‘रेल्वेस्थानकात अतिक्रमण होणार नाही, रेल्वेस्थानक परिसरात स्वच्छता असलीच पाहिजे, बेशिस्त रिक्शा व्यावसायिकांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई करावी’, अशा सूचना खासदार महाडिक यांनी या प्रसंगी केल्या.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !