Drunk Policemen Suspended : मध्यप्रदेशातील सरकारी रुग्णालयात दारू पिऊन आलेल्या पोलिसांनी कचरापेटीत केली लघवी !

४ पोलीस निलंबित

भोपाळ (मध्यप्रदेश) – सिधी जिल्ह्यातील रेवा सरकारी रुग्णालयात एका आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन आलेले चारही पोलीस दारू पिऊन आले होते. त्यातील एकाने तर रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये ठेवलेल्या कचरापेटीतच लघवी केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर या चारही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. उपनिरीक्षक निरीक्षक नर्मदा प्रसाद प्रजापती, हवालदार उदयराज सिंह, हवालदार मनीष तिवारी आणि अन्य एक हवालदार यांना  निलंबित करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

असे पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखणार ?