१५ दिवसांतील दुसरी घटना
प्रतिबंधात्मक उपाय करण्याची ग्रामस्थ आणि शिवप्रेमी यांची मागणी

महाड (जिल्हा रायगड) – येथील रायगड किल्ल्याच्या परिसरात वणवा पेटल्याने मोठी हानी झाली. या आगीत किल्ल्यावर पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्या आणि विद्युत् वाहिन्या अनेक ठिकाणी जळून नष्ट झाल्या आहेत. खरेतर या जलवाहिन्या भूमीच्या खाली १ ते दीड फूट घालायला हव्यात; पण त्या भूमीवरच टाकण्यात आल्या होत्या. (अशा प्रकारे पाट्याटाकूपणे कामे करणार्यांकडून ही हानीभरपाई सव्याज वसूल करून घ्यायला हवी, म्हणजे पुन्हा असे प्रकार होणार नाहीत ! – संपादक) वनविभागाचे अधिकारी ‘रोप-वे’ने (दोरींवर लटकलेल्या वाहकांमध्ये प्रवाशांची वाहतूक करणार्या प्रणालीद्वारे) गडावर पोचले. वणवा विझवण्याचा प्रयत्न केला. येथील हिरकणीवाडीपासून वणवा थेट महादरवाजापर्यंत पसरला. टकमक टोक परिसरातील भाग आगीपासून वाचला.
येथे १५ दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे वणवा पेटला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि शिवप्रेमी यांनी प्रशासनाने वणव्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करावेत, अशी मागणी केली आहे. (पुन्हा तिसर्यांदा वणवा लागू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने प्रयत्न करावेत ! – संपादक)
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक