
गडचिरोली – नक्षलवाद्यांच्या सशस्त्र तुकडीचा (‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’चा) प्रमुख कमांडर सोडी केशालू उपाख्य ‘मल्ला’ याने स्वत:च्या ४० सहकार्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. राष्ट्रविघातक कृत्ये सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा हा निर्णय नक्षल चळवळीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरण आलेल्या या नक्षलवाद्यांनी वापरली जाणारी एके-४७ आणि इन्सास अन् एस्.एल्.आर्.यांसारखी आधुनिक स्वयंचलित शस्त्रेही पोलिसांच्या स्वाधीन केली आहेत.
कोण आहे हा ‘मल्ला’?
जहाल नक्षली नेता बारसे देवानंतर संघटनेत कमांडर मल्ला याचे मोठे वर्चस्व होते. वयाची चाळिशी ओलांडलेला हा नक्षली कार्रेगुट्टा टेकड्यांच्या दुर्गम भागात ३० ते ४० सदस्यांच्या तुकडीचे नेतृत्व करत असे. त्याच्यावर शासनाने २० लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले होते, अशी माहिती समोर येत आहे.
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले