
अहिल्यानगर – नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्यातील २८ आरोपींच्या ७२ मालमत्ता शासनाने जप्त केल्या आहेत. नगर अर्बन बँकेमध्ये २९१ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. (एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा लेखापरीक्षकांच्या लक्षात आला नाही का ? – संपादक) शासनाने कारवाई करून १० संचालक, ४ अधिकारी, तसेच कर्जदार अशा २८ जणांच्या ७२ मालमत्ता जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तसेच उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ठेवी परत करण्यास बँक अपयशी ठरली आहे. त्यामुळे वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी मालमत्ता जप्त करणे, तसेच अन्य मालमत्तांवर नियंत्रण ठेवणे, यासाठी अहिल्यानगरचे उपविभागीय दंडाधिकार्यांनी नियुक्ती केली आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान