माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल्. मुरुगन् यांनी लोकसभेत दिली माहिती
(यू.आर्.एल्. – यूनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. म्हणजे संकेतस्थळे, चित्रे आणि धारिका यांच्या मूळ स्रोताची माहिती देणारा इंटरनेटवरील पत्ता)
नवी देहली – भारतीय सैन्याकडून पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले जात असतांना विविध प्रकारच्या भ्रामक बातम्या सामाजिक आणि डिजिटल माध्यमांवर पसरवल्या गेल्या होत्या. त्यावर केंद्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल्. मुरुगन् यांनी १ एप्रिल या दिवशी लोकसभेत दिली. त्यांनी सांगितले की, या कालावधीत खोट्या बातम्या पसरवल्याच्या आरोपावरून डिजिटल माध्यमांवरील १ सहस्र ४०० हून अधिक ‘यू.आर्.एल्.’ बंद करण्यात आले. राज्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात असेही नमूद केले की, पत्र सूचना कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत ‘फॅक्ट चेक युनिट’ने (माहिती पडताळणार्या गटाने) आतापर्यंत एकूण २ सहस्र ९१३ ‘फॅक्ट-चेक’ (पडताळलेली माहिती) प्रसिद्ध केले आहेत.
राज्यमंत्री मुरुगन यांनी सांगितले की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात डिजिटल माध्यमांवरील ‘यू.आर्.एल्.’ बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी दुसर्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात नमूद केले की, गेल्या ५ वर्षांत कार्यक्रम संहिता आणि जाहिरात संहिता यांचे उल्लंघन केल्याबद्दल खासगी उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ‘अनुमती रहित करणे’ आणि ‘प्रसारण बंद करण्याचे आदेश देणे’, अशा सुमारे १४४ कारवाया करण्यात आल्या आहेत.

Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !