
पुणे, ३० मार्च (वार्ता.) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा विचार जनमानसात रुजवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ५ एप्रिल या दिवशी हडपसर, पुणे येथे भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या सभेचा प्रसार सध्या पुण्यात अत्यंत जोमाने चालू असून ठिकठिकाणी हिंदुत्वनिष्ठांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या’ प्रचारासाठी सध्या पुणे शहरात ठिकठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘जय शंकर प्रतिष्ठान’ आणि ‘ब्राह्मण सेवा संघा’चे संस्थापक अध्यक्ष विप्र शिरोमणी श्री. सु.द. उपाख्य पप्पाजी पुराणिक यांच्या वतीने चैत्र दुर्गाष्टमीच्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात २६ मार्च या दिवशी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांना निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमात सद्गुरु स्वाती खाडये यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. या वेळी श्री. पप्पाजी पुराणिक यांनी धर्मप्रेमींच्या वतीने सद्गुरु स्वाती खाडये यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मान केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश पाठक यांचीही प्रमुख उपस्थिती होती. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचाही २७ मार्च या दिवशी एका अनौपचारिक भेटीत श्री. पप्पाजी पुराणिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हनुमानचालिसा पठण स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा !
‘स्वामी गुरुकुल फाउंडेशन’ आणि डॉ. ज्योतिषाचार्य सौ. वैशाली शरद देशमुख यांच्या वतीने रामनवमीनिमित्त हनुमानचालिसा पठण स्पर्धा, श्रीरामकथा आणि शोभायात्रा यांचे आयोजन करण्यात आले होते. २६ मार्च या दिवशी रामकथेच्या सांगतेनंतर हनुमानचालिसा पठण स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी श्री. पप्पाजी पुराणिक, भागवताचार्य श्री. नरेंद्र जोशी, विद्यमान नगरसेविका माई भाडळे, श्री. अभिजित बोराटे, डॉ. सारिका भाडळे, श्री. राजीव भाडळे, मीनाताई बनकर आणि बाळासाहेब ससाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमातही सद्गुरु स्वाती खाड्ये यांनी उपस्थितांना अमूल्य मार्गदर्शन करून शुभाशीर्वाद दिले. काही मुलांना त्यांच्या हस्ते हनुमानचालिसा पठण स्पर्धेची बक्षिसे देण्यात आली.
हिंदु राष्ट्रासाठी संघटित होण्याचे आवाहन !
सभेचे महत्त्व विशद करतांना सद्गुरु स्वाती खाडये म्हणाल्या की, हिंदु राष्ट्राची निर्मिती ही काळाची आवश्यकता असून प्रत्येक हिंदूने संघटित होणे आवश्यक आहे. श्री. पप्पाजी पुराणिक यांनी या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आगामी सभेला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव