श्री क्षेत्र कांदळी (पुणे) येथे श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा !

प.पू. भक्तराज महाराज

नारायणगाव (जिल्हा पुणे) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे समाधी मंदिर असलेल्या श्रीक्षेत्र कांदळी (ता. जुन्नर) येथे प्रतिवर्षीप्रमाणे ‘श्रीराम जन्मोत्सव सोहळा’ भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ‘श्रीरामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ यांच्या वतीने २५ अन् २६ मार्च या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

२५ मार्च या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीची नित्य नैमित्तिक पूजा आणि नैमित्तिक आरती करण्यात आली. सौ. सई सुयोग रानडे आणि सहकारी यांनी ‘रामायणा’वर नाटिका प्रस्तुत केली. भक्तांद्वारे प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचा कार्यक्रम झाला. २६ मार्च या दिवशी प्रभु श्रीरामचंद्रांस पवमान अभिषेक, आरती करण्यात आली. कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम थिटे (पुणे) यांचे कीर्तन झाले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.