नवी देहली – देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याच्या उद्दिष्टावर ३० मार्च या दिवशी संसदेत सविस्तर चर्चा होणार आहे. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत भारताला नक्षलमुक्त करण्याची समयमर्यादा निश्चित केली असून या उद्दिष्टाच्या जवळ पोचल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.
१. गेल्या १ वर्षात अनेक मोठ्या माओवादी नेत्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग स्वीकारला आहे. अलीकडेच २५ मार्च या दिवशी ओडिशामध्ये वांछित माओवादी नेता सुकृ याच्यासह ४ जणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर एकूण ६६ लाख रुपयांचे पारितोषिक होते.
२. ओडिशा पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक संजीव पांडा यांच्या माहितीनुसार कंधमाल जिल्ह्यात आता केवळ ८ ते ९ नक्षलवादी उरले आहेत. ‘उर्वरित नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण करावे’, असे आवाहन करत ‘सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा पूर्ण लाभ दिला जाईल’, असे आश्वासन त्यांनी दिले. छत्तीसगडमधील दंडकारण्यातही प्रथमच नक्षल संघटना जवळपास नेतृत्वहीन झाली आहे. हे सरकारसाठी मोठे यश मानले जात आहे.

Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena