
अक्कलकोट – येथील ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’त रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. ‘श्रीराम जन्मला गं बाई…’ या जयघोषात धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तीमय झाला. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२ वाजता पाळणा सोहळा पार पडला आणि पुरोहित विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते विधीवत् पूजा झाली. या वेळी विश्वस्त, पदाधिकारी, सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !