फोंडा येथे काढण्यात आलेली नववर्ष स्वागत फेरी

फोंडा, २१ मार्च (वार्ता.) – गोवा ही मंदिरांची भूमी आहे. मानवी इतिहासातील सहस्रो वर्षांपूर्वीची अत्यंत प्रगत, समृद्ध संस्कृती गोव्याला लाभली आहे. याचे अनेक पुरावे आजही मिळतात, असे वक्तव्य हिंदुत्वनिष्ठ व्याख्यात्या आणि सांस्कृतिक इतिहास अभ्यासक सौ. शेफाली वैद्य यांनी केले. हिंदु सांस्कृतिक न्यासाच्या वतीने क्रांती मैदान, फोंडा येथे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘देवतांचे दक्षिण गोव्यातून अंत्रुज महालात स्थलांतर’, या विषयावर त्या बोलत होत्या. प्रारंभी सकाळी हिंदु सांस्कृतिक न्यासाच्या वतीने शहरात नववर्ष स्वागत फेरी काढण्यात आली आणि फेरी क्रांती मैदानात पोचल्यावर तेथे गुढीपूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी क्रांती मैदानात सौ. शेफाली वैद्य यांचे मार्गदर्शन, मान्यवरांचा सत्कार आदी कार्यक्रम झाला.

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘गोव्यातील इतिहास पोर्तुगिजांच्या चष्म्यातून आणि पर्यटनाच्या भिंगातून दाखवला गेला. त्यामुळे गोव्याची प्राचीन संस्कृती आणि इतिहास आपल्याला ठाऊक नाही. पोर्तुगिजांनी तब्बल ४५२ वर्षे येथील संस्कृती नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी आटोकाट प्रयत्न केले. वर्ष १५४० मध्ये त्यांनी येथील हिंदूंचे धर्मांतर चालू केले. वर्ष १५६६ ते १५६७ या कालावधीत बार्देश तालुक्यातील ३०० मंदिरे पाडली. हिंदूंच्या धार्मिक विधींवर बंदी घालणारे कायदे बनवण्यात आले. या जुलमी राजवटीविरुद्ध कुंकळ्ळी येथील हिंदूंनी तीव्र प्रतिकार केल्यावर तेथील १६ नेत्यांचे हत्याकांड करण्यात आले. पोर्तुगिजांच्या कठोर कायद्यामुळे हिंदू गुढीपाडव्याला गुढी उभारू शकत नव्हते. आपल्या पूर्वजांनी चिवटपणे प्रतिकार केला म्हणून आज आपण सर्व हिंदु म्हणून अस्तित्वात आहोत. गोव्याची संस्कृती ही अनेक आक्रमणांनंतर आजही टिकून आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येथील सनातन संस्कृती ही केवळ मंदिराभोवती न रहाता घरोघरी आचरणात आणली जात होती. आपल्या पूर्वजांनी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी किती कष्ट घेतले, किती अत्याचार सहन केले, हे सर्व जाणून घेणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या पुढील पिढीपर्यंत हा इतिहास पोचवणे आवश्यक आहे.’’
यानंतर डॉ. पौर्णिमा राजेंद्र केरकर निर्मित ‘नदी वहाते’ या नृत्य-संगीत नाटिकेतून गोव्यातील म्हादई नदीच्या अस्तित्वाविषयी प्रबोधन करण्यात आले.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !