मालवण शहरातील अतिक्रमणाकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

मालवण – शहरातील भरड येथील मुख्य रस्त्यावर नगरपालिकेच्या वाहनतळासमोर अतिक्रमण झाले आहे. ते हटवण्याविषयी वारंवार मागणी करूनही नगरपालिका प्रशासनाने कार्यवाही न केल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संतप्त नगरसेवकांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यालगत चालू असलेले एका दुकानाचे अतिक्रमण थांबवले. या वेळी संबंधित व्यावसायिक आणि नगरसेवक यांच्यामध्ये वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
१. मालवण-कसाल मार्गावरील भरड ते देऊळवाडा या मुख्य रस्त्यावर विक्रेते आणि टपरीधारक यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत.
२. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याकडे नगरसेवक मंदार ओरसकर यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले होते; मात्र प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने अंततः महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर आणि उमेश चव्हाण या नगरसेवकांनी घटनास्थळी जाऊन नगरपालिकेच्या वाहनतळासमोर एका भाजी विक्रेत्याच्या दुकानाची शेड उभारण्याचे चालू असलेले काम थांबवले.
३. नगरसेवकांनी स्वतः कारवाई चालू केल्याचे समजताच नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी आले.
४. त्यांनी संबंधित व्यावसायिकाला अनधिकृत बांधकाम न करण्याचे तोंडी आदेश दिले; मात्र केवळ तोंडी आदेशावर न थांबता ठोस कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली आहे.
संपादकीय भूमिकानगरपालिका प्रशासनातील अधिकारी अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करत असतील, तर असे अधिकारी हवेत कशाला ? |
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद