
पुणे – संस्कृतमधील बौद्ध ग्रंथ समजून घेण्यासाठी अभ्यासक्रम शोधत असतांना ब्राझिलमधील एका प्राध्यापकांचा संपर्क ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’शी आला. त्यांनी ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’च्या ‘भाषाङ्कुरः’ (स्तर १) या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. अवघ्या ६ महिन्यांत त्यांनी संस्कृत श्लोक योग्य पद्धतीने म्हणणे, शब्दांचे विभाजन (पदच्छेद) करणे इत्यादी मूलभूत कौशल्ये आत्मसात् केली. अभ्यासक्रमाच्या शेवटी घेण्यात आलेल्या बहुपर्यायी प्रश्नांच्या (एम्.सी.क्यू.) परीक्षेत पात्र ठरलेल्या ५ विद्यार्थ्यांपैकी ते एक आहेत.
या स्तराच्या दुसर्या तुकडीमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ १५ मार्चला होणार आहे. या कार्यक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला विशेष स्मृतीचिन्ह म्हणून ताम्रपट प्रदान करून गौरवण्यात येणार आहे, असे ‘फाऊंडेशन’चे सहसंस्थापक डॉ. रोहन कुलकर्णी यांनी सांगितले.
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !