(‘बसपोर्ट’ म्हणजे विमानतळावर प्रवाशांना देण्यात येणार्या आधुनिक सेवा बसस्थानकांवरही उपलब्ध करून देणे)
|

मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – राज्यातील एस्.टी महामंडळाच्या बसस्थानक आणि आगार यांचा कायापालट करण्यासाठी राज्यशासनाने कंबर कसली आहे. गुजरात राज्याच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही अत्याधुनिक ‘बसपोर्ट’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी नवीन धोरण आखण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य प्रवीण दरेकर यांनी नियम ९२ अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देतांना ते बोलत होते.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की,
१. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील एस्.टी बसस्थानके प्रवासी सुविधांनी सुसज्ज केली जातील.
२. एस्.टी. आगाराच्या व्यावसायिक विकासासाठी प्रत्यक्ष भाडेकरार ‘४९+४९’ म्हणजेच एकूण ९८ वर्षांचा ठेवण्याचे प्रावधान करण्यात आले आहे. यामुळे गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळून महामंडळाला दीर्घकालीन आर्थिक उत्पन्न प्राप्त होईल. प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळेल.
३. केवळ शहरांचा विचार न करता ग्रामीण भागाचाही संतुलित विकास साधला जाईल. आहे. यासाठी ‘शहरी, तालुका आणि ग्रामीण’ अशा ३ आगारांचे एकत्रित पॅकेज करून निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. यामुळे दुर्गम भागातील बसस्थानकांचेही नूतनीकरण होईल.
४. या विकास प्रकल्पांतून स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !