
पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक संस्थांचे मार्गदर्शक डॉ. सतीश वळसंगकर (वय ७२ वर्षे) यांचे १२ मार्च या दिवशी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोलापूर आणि पुणे येथील शैक्षणिक अन् सामाजिक क्षेत्रांत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर सोलापूर आणि पुणे येथील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील नामवंत ‘हरिभाई देवकरण प्रशाला’ आणि ‘सोलापूर जनता सहकारी बँक’ यांसह अनेक महत्त्वाच्या संस्थांवर संचालक म्हणून काम पाहिले होते. आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीने त्यांनी या संस्थांच्या विकासात मोलाची भर घातली.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव